पारनेर ( वृत्तसेवा ) :
पारनेर जि अहमदनगर येथील शिरापुर येथील पैलवान निलेश उचाळे याने इचलकरंजी ( कोल्हापूर) येथे झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ७१ वजनगटात नामवंत पैलवानाला पराभूत करीत रोप्य पदकाचा मानकरी ठरला असून त्याचे सर्वत्र स्वागत होत असून अभिनंदन होत आहे . निलेश हा नामवंत पैलवान व जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे यांचा पठ्या असून त्याने गेली पाच वर्षात अनेक जिल्हा स्तरावर तसेच राज्य स्तरावर कुस्त्या जिंकल्या असून सुवर्ण पदक, रोप्य पदक मिळवले आहेत. शिरापुर येथील मच्छिंद्र उचाळे यांनी सर्वसामान्य परस्थीतीत निलेश याला शिक्षण देऊन कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवीण्यासाठी परिश्रम घेतले असून निलेश याने मधुकर उचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश मिळवून प्रयत्न सार्थकी केले आहेत . अहमदनगर,पुणे, कोल्हापूर,सातारा सांगली या जिल्ह्यातील कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन अनेक नामांकणे मिळवली आहेत . कुस्ती क्षेत्रात नाव करण्याचा निलेश याचा उद्देश असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत भाग घेण्याचा त्याचा मनोदय आहे. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एखाद्या मोठ्या उद्योग समूहाने सहकार्य केल्यास निलेश याची ईच्छा पुर्ण होणार आहे. यासाठी एखाद्या मोठ्या उद्योग समूहाने किंवा नामांकित कंपनीने निलेश यास दत्तक घेऊन निलेश यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहकार्य करावे अशी इच्छा पारनेर तालुका पैलवान प्रतिष्ठान पदाधिकारी व सदस्य यांनी केली असून यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील पैलवान मंडळी व कुस्ती शौकीन प्रयत्नशील असून त्यासाठी नामांकित कंपनी व उद्योग समूहाने संपर्क साधावा व सहकार्य करावे असे आवाहन कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.