गुन्हेपुणे जिल्हा

आमदाबाद येथील देवदर्शनासाठी गेलेल्या तरुणांची मृत्युची संख्या सहावर पोहचली,,

पुणे नगर रस्त्यावर कामरगाव येथे झाला होता टेम्पोला अपघात

टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या तरुणांच्या अपघातात जागीच ४ जण ठार झालेले असताना त्यातून सावरताना आमदाबादकरांना पुन्हा धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला समाधान श्रावण साळवे (वय १८) यांच्या पाठोपाठ ओंकार गोरखे ( वय १७ ) यांचेही नगर येथे उपचार सुरु असताना मृत्यु झाल्यांने अपघातील मृत्युची सहावर पोहचली आहे .
गुढीपाडव्याच्या दिवशी (दि. २३) आमदाबाद येथील तरुण छोट्या टेम्पोतून शनिशिंगणापूर व देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर कामरगावजवळ झालेल्या या अपघातात विजय अवचिते, राजेंद्र साळवे, मयूर साळवे व धीरज मोहिते यांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले होते. त्या पैकी शनिवारी समाधान श्रावण साळवे यांचे शनिवारी तर ओंकार गोरखे यांचे रविवारी निधन झाले आहे .

जखमींपैकी तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. त्यातील समाधान साळवे याचा शनिवारी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो अकरावीत होता व वाजंत्री कलाकार म्हणून परिसरात प्रसिद्ध होता. ओंकार जालिंदर गोरखे हाही शिक्षण घेत होता तसेच वाजंत्री म्हणुन काम करीत होता, गावातील युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थांवर मोठी शोककळा पसरली आहे.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page