टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) शेतमालाचा बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्यामुळे शेती करणे म्हणजे जुगार खेळणे अशीच अवस्था झाल्यांने बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला असुन ,तरुण शेतकरी वैफल्यग्रस्त भावना व्यक्त करीत असल्यांचे चित्र ग्रामिण भागात दिसत आहे .
या वर्षी पाऊस शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमानात झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पिके अक्षरक्षः अनेक महीने पाण्यात सडुन गेली. पंचनामे करण्याचा दिखावा सरकारने केला मात्र पदरात काहीच पडले नाही शेतकरी त्या मधुन सावर असताना रब्बीचा साठवलेला कांदा तरी प्रंपचाला उभारी देईल अशी आशा होती शिरूर तालुक्यात हजारो टन कांदा कांदाचाळीत साठवुन ठेवलेला आहे, मात्र दुसरे वर्षे लागले तरी कांद्याला अद्यापही मातीमोल भाव मिळत असुन, उत्पादन खर्चही निघत नाही . शेतकर्यांनी सध्या कोबी व फ्लावर पिकामधे जनावरे सोडण्याची वेळ आली असुन ५० किलोच्या पोत्याला अवघे शंभर रुपये मिळत आहे . त्यामुळे त्यासाठी लाखो रुपये केलेला खर्चही बाजार भाव न मिळाल्यांने पिकात शेळ्यामेंढ्या सोडण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे .
मजुरी मशागत मधे दुप्पट वाढ ..
शेतामधे कांदा लावगडी साठी मजुर मिळणे अवघड झाले होते . प्रत्येक मजुराला जेवन राहण्यांची व्यवस्था करून चारशे रुपये रोज या प्रमाने मजुरी दिली जाते .त्यामुळे मजुरीत मोठी वाढ झाली आहे . त्याशिवाय डिझेल पेट्रोल वाढल्यांने टॅक्टर मशागतही महागली आहे . रासायनिक खते किटकनाशक यावरही जीएसटी कर मोठ्या प्रमाणात असुन त्यामुळे उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झालेली आहे . मात्र तुलनेने दहा वर्षात शेतमाल बाजार भावात वाढ न होता घट झाल्यांने बळीराजा वरचा कर्जाचा डोंगर वाढत चालला असुन, नवीन शेती करणारा युवक वर्ग सततच्या तोट्याच्या संकटामुळे हतबल झाला आहे .
मुलांचे शिक्षण लग्न आरोग्य यांचा खर्च करायचा कुठून
शेतकऱ्यांची शेती सतत तोट्यात जात असल्यांने मुलांचे शिक्षण , कुंटुबाचे आरोग्य मुलांचे लग्न यासाठी खर्च करण्यासाठी शेतीवर अवलंबुन असणाऱ्या शेतकर्याला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे .शेती करण्यासाठी खर्च भरमसाठ वाढला असुन, गेल्या वर्षीच्या कांद्याचा खर्चही निघाला नाही . आता शेतीसाठी कर्ज काढुन भांडवल खर्च करावा लागत असुन पुढील वर्षी तरी भाव मिळेल का हे रामभरोसे आहे अशी प्रतिक्रिया कवठे येमाई येथील शेतकरी विलास रोहीले यांनी व्यक्त केली .
कोबी फ्लॉवर मधे जनावरे सोडविण्याची वेळ आली असुन शासनाने शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहीजे अशी मागणी शेतकरी देवीदास पवार यांनी व्यक्त केली .शेतकरी कंगाल – व्यापारी मालामाल -कांद्याला शेतकर्याला प्रती दहा रुपये किलो भाव मिळत असला तरी किरकोळ व्यापारी ग्राहकाला २० रुपये तर शंभर रुपयात ५० किलो शेतकऱ्या कडुन कोबी फ्लॉवर घेतात व प्रती गड्डा २० रुपये किलोने विकुन ग्राहकालाही लुटतात,, त्यामुळे शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल अशी अवस्था झाली आहे .