गुन्हेमहाराष्ट्र

आमदाबाद गावावर शोककळा, देवदर्शन करुण परतलेले चार जन अपघातात ठार

पुणे नगर रस्त्यावर झाला अपघात - सात जनांवर उपचार सुरु

शिरूर : ( वृत्तसेवा ) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवदर्शन करूण परतलेल्या आमदाबाद (ता.शिरूर) येथील भाविकांचा अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे .

आमदाबाद ता शिरूर येथील भाविक बुधवारी ( दि.२२) देवदर्शनासाठी देवगड व शनी शिंगणापूर येथे गेले होते.देवदर्शन करून परतत असताना रात्री सव्वा बाराच्या सुमारास पुणे -नगर महामार्गावर सुपे ते कामरंगाव च्या दरम्यान चौधरी ढाब्याजवळ कंटेनर आणि ट्रक चा भीषण अपघात झाला. यावेळी कंटेनर भाविकांच्या गाडीवर आदळला असून कंटेनरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघातात आमदाबाद येथील राजेंद्र विष्णू साळवे (वय ३३ वर्ष), विजय राजेंद्र अवचिते (वय २६ वर्षे), धीरज मोहिते (वय १० वर्षे), मयुर संतोष साळवे ( वय २५ वर्षे), यांचा मुत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर अ.नगर येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे.

गावातील प्रमुखांनी नगरकडे धाव घेतली असून जखमींवर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे माजी चेअरमन अशोक माशेरे यांनी सांगितले.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page